मुंबई :  पुण्यातील भिमा कोरेगाव घटनेतून दलित आणि मराठे यांच्यात दंगल घडवण्याचा कट असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची महत्वाची बैठक मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे राज्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 


 
 देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  
 बैठकीआधी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन भीमा कोरेगावमधली घटना आणि त्याचे राज्यभर उमटलेले पडसाद यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. कटात सहभागी असलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 


 
 जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा या दंगलीशी संबंध नसल्याचा दावा


 
 त्याचबरोबर दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई आणि मृत झालेल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. तर जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा या दंगलीशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे सामाजिक ऐक्य होत असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मंत्री असल्याने आपण बंदमध्ये जाहीरपणे बाहेर आलो नाही. मात्र आपले कार्यकर्ते त्यावेळी रस्त्यावर होते, असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.