मुंबई : नारायण राणे आणि अमित शाहांच्या भेटीबद्दल कदमांनी जोरदार टोला हाणलाय. राणेंचं हॉस्पिटलच्या उद्घाटनासंबंधी काम होतं, असं म्हणत राणेंना हॉस्पिटलची गरज असल्याची कोपरखळी हाणली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्यातल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय. 


मराठवाड्यातल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात बैठक घेतली. त्यानंतर कदम बोलत होते.


आगामी निवडणुकीत भाजपसोबत जायचं नसेल तर स्वबळावर सत्ता कशी मिळवायची? याबाबत उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातल्या आमदारांशी चर्चा केल्याची माहिती कदमांनी दिली. 


मंत्र्यांबाबतचे प्रश्नही उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्याचं कदमांनी सांगितलं. या बैठकीत शिवसेनेचे मराठवाड्याचे नाराज आमदार हर्षवर्धन जाधवही उपस्थित होते.