Uddhav Thackeray : कोकणात राजकीय शिमगा! राणेंचे चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्वीकारले; केली मोठी घोषणा
6 मे ला बारसूला जाणार घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकेर यांनी भाषणात पत्राचा देखील उल्लेख केला. 6 तारखेला बारसूला जाऊन बारसूच्या लोकांना भेटून बोलणार आहे. बारसू पाकिस्तान किंवा बांगलादेशचा भाग नाही.
Mahavikas Aghadi Vajramuth Sabha: बारसू प्रकल्पावरुन कोकणात राजकीय शिमगा पहायला मिळणार आहे. बारसू रिफायनरीला होणा-या विरोधावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांना आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत नारायण राणे यांचे चॅलेंच स्वीकारले आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. बारसू जाणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी तारीख देखील जाहीर केली आहे. तसेच पत्राबाबतही उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
6 मे ला बारसूला जाणार
उद्धव ठाकरेंनी कोकणात येण्याची तारीख जाहीर करावी. आम्ही पण तिकडे येतो असं आव्हान राणेंनी दिलं होते. हे आव्हान उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत स्वीकारले आहे. पण येत्या 6 मे ला बारसूला जाणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी येत्या 6 तारखेला बारसूत जाऊन बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी बारसूला जाणार. 6 तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी केला पत्राचा उल्लेख
6 मे ला बारसूला जाणार घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकेर यांनी भाषणात पत्राचा देखील उल्लेख केला. 6 तारखेला बारसूला जाऊन बारसूच्या लोकांना भेटून बोलणार आहे. बारसू पाकिस्तान किंवा बांगलादेशचा भाग नाही. उद्धव ठाकरे यांनी जागा सुचवली होती असं माझ्या नावाचं पत्र नाचवलं जात आहे. पण, त्या पत्रात पोलिसांनी कारवाई करावी असं म्हटलेल नाही. पण स्थानिकांच्या विरोधात हा प्रकल्प व्हावा, असं पत्रात म्हटलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आमच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करणाऱ्यांविरोधात आम्ही बोलणारच. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा हिसका पाहिला आहे. विधान परिषद, बाजार समिती निवडणुक, कसबा, अंधेरी निवडणुक. सर्व निवडणुकीत चारी मुंड्या चित केले आहे. अनेक जण अद्याप बाळासाहेबांना भेटले देखील नाहीत तरी देखील त्यांच नाव घेऊन राजकारण करतात.
मुंबईच्या BKC ची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. बुलेट ट्रेनने किती लोक अहमदाबादला जातील. कोण प्रवास करणार या बुलेट ट्रेनने. मी बुलेट ट्रेनसाठी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव सुचवला होता. यामुळे हा प्रवास बदलापूरपर्यंत विस्तारता आला असता. माझा प्रकल्पाला नाही तर जागेला विरोध होता. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. सर्व उद्योगधंदे मुंबई बाहेर नेण्याचा यांचा डाव आहे.