राणेंच्या भाजप प्रवेशावरुन शिवसेनेने उडवली खिल्ली
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे नेते अरविंद भोसलेंनी टीका करणारी पोस्टर लावली. आता ही पोस्टर हटवण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केलीय.
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे नेते अरविंद भोसलेंनी टीका करणारी पोस्टर लावली. आता ही पोस्टर हटवण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केलीय.
माजी मुख्यमंत्री नारायण यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर शिवसेनेनं मुंबईत होर्डिंगबाजी सुरु केलीय. पक्षाचे नगरसेवक,प्रवक्ते अरविंद भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारे होर्डिंग वरळी नाक्यावर लावलं.
या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलंय. होंडिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा वादग्रस्त आहे. त्यामुळं ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर राणे विरुद्ध शिवसेना असा शिमगा रंगण्याची चिन्ह आहेत.
राणेंचा भाजप प्रवेश नक्की झाल्यास हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोस्टर हटवण्यास आलेले आहे.