मुंबई : सिंधुदुर्गातील (Sindhudurga) चिपी विमानतळाचं (Chipi Airport) आज लोकार्पण झालं. या उद्घाटन सोहळ्यानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पुढाकाराने विमानतळाचं स्वप्न पू्र्ण होत आहे, कोकणाचा विकास यासाठी भाजपा कटिबध्द असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार मानले आहेत. 


कोकणवासियांसाठी आजचा दिवस आनंदाचा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचं आज उदघाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचं मन:पूर्वक आभार मानतो असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या विमानतळासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली आणि आज ते स्वप्न साकार झालं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे मनापासून आभार, सर्व कोकणवासियांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


आमंत्रण नसल्याने नाराजी


चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. यावर प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. चिपी विमानतळाच्या बांधकामात देवेंद्र फडणवीस यांचं योगदान असतानाही त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नाही, हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता.