मनमोहन सिंगांचे `ते` विधान म्हणजे काँग्रेसचा दुटप्पीपणा- रणजीत सावरकर
गांधी हत्येनंतर काँग्रेसच्या इशाऱ्यावर काहीजणांनी माझे आजोबा नारायण सावरकर यांच्या घरावर हल्ला केला होता.
मुंबई: काँग्रेस पक्षाचा सावरकर नव्हे तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला विरोध आहे, हे मनमोहन सिंग यांचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या दुटप्पीपणाचे प्रतिक असल्याची टीका सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी केली. केवळ इंदिरा गांधी याच सावरकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या काँग्रेसमधील एकमेव नेत्या असल्याचेही त्यांनी म्हटले.
शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- मोदी
पंडित नेहरू यांच्यानंतर देशातील सर्वात मोठे नेतृत्व असलेल्या इंदिराजी यांचा गांधींच्या नव्हे तर सावरकरांच्या विचारसरणीवर विश्वास होता. त्यामुळेच भारतीय लष्कराच्या सामर्थ्यावर त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकवायला भाग पाडले. ही गांधींजीची विचासरणी नाही. शत्रूपेक्षा जास्त ताकद असेल तेव्हाच शांतता प्रस्थापित करता येते, हा सावरकरांचा विचार होता, याकडे रणजीत सावरकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचा विरोध सावकरांना नव्हे तर त्यांच्या हिंदुत्वावादी विचारसरणीला- मनमोहन सिंग
यावेळी रणजीत सावरकर यांनी एक गौप्यस्फोटही केला. गांधी हत्येनंतर काही लोक माझे आजोबा नारायण सावरकर यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी आले होते. दरवाजा उघडला नाही तर घर जाळून टाकू, अशी धमकी जमावाने दिली. यानंतर नारायण सावरकर यांनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांच्या डोक्यावर वीट फेकण्यात आली. यानंतर आमच्या कुटुंबाला कुठेच आश्रय मिळत नव्हता. त्यावेळी माझे आजोबा मुंबईच्या केईएम रुग्णालयात भरती होते. त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. हे सर्व काँग्रेसच्या इशाऱ्यावर झाले होते. त्यामुळे या घटनेबाबत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये काहीच छापून आले नाही. परंतु, न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य परदेशी वृत्तपत्रांमध्ये याबद्दल छापून आल्याची आठवण रणजीत सावरकर यांनी सांगितली.