मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचं वेगळेपण आपण अनेकदा अनुभवलं आहे. पण त्यांचा साधेपणा अनुभवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. रतन टाटा यांचा 28 डिसेंबर रोजी 84 वा वाढदिवस साजरा केला. एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा वाढदिवस किती सामान्य आणि साधेपणाने असेल याचा आपण विचारही केला नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोयनका यांनी हा व्हिडीओ 29 डिसेंबर रोजी शेअर केला. ज्यानंतर तो अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 30 सेकंदाच्या या व्हिडिओत रतन टाटा शांतनू नायडूसोबत दिसत आहे. 



व्हिडीओत रतन टाटा कप केकवर असलेल्या मेणबत्तीला फुंकर मारत आहेत. यानंतर शांतनु त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात. 


अगदी छोटासा केकचा तुकडा घेतो आणि रतन टाटा यांना भरवतो. इतक्या साधेपद्धतीने अब्जाधीश रतन टाटा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 


कोण आहे शांतनु नायडू? 


28 वर्षांचा शांतनु अगदी लहान वयातच व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. शांतनुने आपल्या व्यवसायातील कल्पना सांगून उद्योगपती रतन टाटा यांना स्वतःचा चाहता बनवलं आहे. 


शांतनुची एक कंपनी आहे. ज्याचं नाव मोटोपॉज. ही कंपनी कुत्र्यांच्या कॉलरची निर्मिती करते. ही कॉलर काळोखात चमकते. जेणे करून कोणत्या वाहनामुळे त्याचा अपघात होऊ नये. रतन टाटा स्वतः ज्यामध्ये गुंतवणूक करतात त्यामागचं डोकं हे 28 वर्षीय शांतनुचं असतं.