Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी
सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये (Ration Card) नाराजीचं वातावरण आहे.
मुंबई : दिवाळी (Diwali 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राज्य सरकारला (Maharashtra Government) मात्र आपल्या घोषणेचा विसर पडलेला दिसतोय. अद्याप रेशन कार्डधारकांना (Ration Card Holder) अजूनही दिवाळी स्पेशल 100 रुपयात देण्यात येणार कीट मिळालेलं नाही. त्यामुळे सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तसेच विरोधी पक्षाकडूनही या योजनेवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. (ration card holders have still not received diwali special Rs 100 kit from the maharashtra government)
राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या 100 रुपयांच्या किटमध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी मसूर डाळ देण्यात येणार होता. मात्र रेशन धारकांना अजूनही हे कीट मिळालेलं नाही.
गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणाच आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केलीय. तर मनसेनंही हे किट अजून रेशन दुकानांमध्ये पोहचलंच नसल्याचा आरोप केलाय. तसंच टेंडरमध्ये घोळ असल्याचा आरोपही मसने नेते संदीप देशपांडेंनी केलाय.