मुंबई : अखेर राणा दाम्पत्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांचा मुक्काम भायखळा जेलमध्ये तर रवी राणा यांचा रात्रीचा मुक्काम तळोजा जेलमध्ये असणार आहे. पोलीस नवनीत राणा यांना घेऊन भायखळा कारागृहात पोहचल्या आहेत. तर रवी राणा थोड्याच वेळात तळोजा जेलमध्ये पोहचणार आहेत. (ravi rana and navneet rana sent to taloja and byculla jail)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणा दाम्पत्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांची रवानगी सांताक्रूझ पोलीस ठाण्यातून जेलमध्ये करण्यात आली. कोर्टानं दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



शिवसैनिकांची तळोजा कारागृहाबाहेर गर्दी


दरम्यान शिवसैनिकांनी तळोजा कारागृहाबाहेर गर्दी केली आहे.  राणा दाम्पत्याला प्रसाद द्यायची संधी मुंबईत हुकली मात्र दुसरी संधी आम्हाला भेटावी यासाठी आम्ही तळोजा कारागृहाबाहेर जमलो असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक व्यक्त केली. तळोजा जेल बाहेर शिवसैनिक हळूहळू गर्दी करत आहेत.  शिवसेनेचे कार्यकर्ते हार तुरे आणि पेढ्यांचा बॉक्स घेऊन रवी राणा यांना प्रसाद देण्यासाठी सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसैनिक व्यक्त करतायत.