मुंबई : RBI MPC: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी चलनविषयक त्रैमासिक पतधोरण जाहीर केले. एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर (Repo Rate) 4 टक्क्यांवर कायम आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, समितीने धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.(RBI Monetary Policy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के (Reverse repo rate) राहील. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के असेल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरने धोरणात्मक भूमिका 'अनुकूल' ठेवली आहे. केंद्रीय बँकेने सलग 9व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी अखेरचे व्याजदर बदलले होते.


'खासगी गुंतवणुकीला गती देण्याची गरज'
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक बाजारपेठांमध्ये कोविड-19 महामारीमुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत आणि भारतालाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे, ज्यामध्ये आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे.


आता आपण कोरोनाला तोंड देण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत. शक्तीकांता दास म्हणाले की, देशात अजूनही खाजगी गुंतवणुकीला गती देण्याची गरज आहे. देशाच्या काही भागात नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यांमधून येणाऱ्या महसुलावरही परिणाम झाला आहे.


जीडीपी लक्ष्यात बदल नाही
चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) बैठकीच्या लक्ष्यात कोणताही बदल झालेला नाही. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आर्थिक विकास दराचे लक्ष्य 9.5 टक्के ठेवण्यात आले आहे.