Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये इतके दिवस बँका बंद असणार, जाणून घ्या
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबरमध्ये बँकांना असलेल्या (November Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
मुंबई : ऑक्टोबर संपायला आता अवघे काही दिवस उरलेत. 2022 मधला 11 वा महिना म्हणजेत नोव्हेंबर सुरु होणार आहे. बँकेत (Bank) प्रत्येकाची कामं असतात. मात्र जर पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची काम असतील तर आधी बँकाचं कामकाज किती दिवस चालणार (Bank Holiday List) आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबरमध्ये बँकांना असलेल्या (November Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्या कमी आहेत. नोव्हेंबरमध्ये दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार यासह 30 दिवसांत एकूण 9 दिवस बँका बंद असतील. (rbi reserve bank of india released bank holiday list november 2022 month)
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये 1, 8, 11 आणि 13 तारखेला बँकांना सुट्ट्या असणार आहेत. तसेच 6, 12, 13, 20, 26 आणि 27 तारखेला दुसरा-चौथा शनिवार आहे. तसेच रविवारी बँकेचं कामकाज बंद असतं. ऑक्टोबरमध्ये दिवाळीसह इतर सणांच्या पार्श्वभूमीवर बँकांना एकूण 21 दिवस सुट्टी होती.
बँकांना असलेल्या सुट्ट्या या राज्यानुसार असतात. प्रत्येक राज्यात होणाऱ्या महत्त्वाच्या सणांनुसार सुट्ट्या असतात. मात्र बँका बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंगद्वारे व्यवहार करता येईल. दरम्यान आरबीआय दर महिन्याला वेबसाईटवर बँक हॉलिडेची यादी अपडेट करते. आरबीआयच्या या वेबसाईटवर तुम्ही ही सुट्टीची यादी पाहू शकता.