मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. केवळ आणि केवळ मानपनामुळे शिवसेना-भाजपची युती अडल्याचं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसेच इतक्या सर्व सत्तानाट्यानंतर पुन्हा एकदा  युतीची चर्चा रंगू लागली आहे. (rebel eknath shinde group spockperson deepak kesarkar on shiv sena bjp alliance)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाजूला युतीची चर्चा असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी युतीबाबत वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय.


अरविंद सावंत काय म्हणाले? 


"माध्यमांसाठी मोठं असलेलं विधान शिवसेनेसाठी खोटं आहे. जनतेत भ्रम निर्माण करण्यासाठी असली विधानं केली जात आहेत. निष्ठावतं शिवसैनिक यांच्या भूलभुलैयाला बळी पडणार नाही. लोकांमध्ये थोतांड माजवून सहानभूती मिळवायची, अशी त्यांची निती आहे", अशा शब्दात सावंत यांनी टीका केली.