मुंबई : एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत भाजपसह सत्तास्थापन केली. शिवसेनेतून 40 आमदार बंड करुन बाहेर निघाले. मात्र त्यांच्या मनात उद्धव ठाकरे, ठाकरे कुंटुंबिय आणि मातोश्रीबाबत मनात असलेला आदर  कायम असल्याची प्रचिती आज पुन्हा आली. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. या टीकेवरुन शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर चांगलेच संतापले. उद्धव ठाकरेंवर कोणीही टीका करु नये, अशा शब्दातच केसरकर यांनी इशारा दिला आहे. (rebel eknath shinde mla group spokesperson deepak kesarkar slams to kirit somaiya for uddhav thackeray criticize)


केसरकर काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आम्ही आमचं कुटुंब सोडून आलो आहोत. पण आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये. पण काल सोमय्या बोलले. हे मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. आमच्या पक्षप्रमुखाबद्दल आम्हाला आदर आहे. फडणवीस सोमय्या यांच्यासोबत बोलतो असं म्हणाले. माझेही सोमय्या यांच्यासोबत बोलणं झालं", असं केसरकर म्हणाले. केसरकर आज दुपारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.


"मी ही सोमय्या यांना भाजपमधील संजय राऊत आहेत का? असं म्हणालो होतो.  मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. मी कायमस्वरूपी प्रवक्ता नाही. उद्धव ठाकरे यांच्याबाबत मनात आदर आहे. त्यांच्याबद्दल बोलणार नाही. ठाकरे कुटुंबावर टीका झाली त्यावेळी आम्ही कोणीही गप्प नव्हतो. उद्धव ठाकरे कुटुंबावर कोणीही टीका करायची नाही, असे आमचे भाजपसोबत ठरले होते. किरीट सोमय्या यांना हे माहीत नव्हते", असंह केसरकर यांनी स्पष्ट केलं. 


"नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानतात. मोठ्या लोकांनी मोठ मन करून माफ करायचे असते. मन जुळून येतील, वेळेनुसार घाव भरले जातात", असंही केसरकर म्हणाले.