Eknath Shinde Live : शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटी एअरपोर्टवरुन गोव्यासाठी रवाना झालेत. बंडखोर आमदारांनी 8 दिवसांच्या मुक्कामानंतर गुवाहाटीतलं रॅडिसन ब्लू हॉटेल सोडलं. आता त्यांचा आजचा मुक्काम गोव्यात असेल त्यानंतर हे सर्व आमदार उद्या मुंबईत येतील. त्यासाठी गोव्यामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुवाहाटी सोडताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा दावा केला आहे. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. उद्या आम्ही मुंबईला पोहोचणार, बहुमत चाचणीत सहभागी होणार आणि पुढची प्रक्रियाही आम्ही करणार आहोत. आम्ही सर्व 50 आमदार उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.


बहुमत चाचणी झाल्यानंतर आमदारांची बैठक होईल त्यानंतर पुढील रणनिती ठरवू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 


तसंच आसामच्या  लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, इथल्या मंत्री, प्रशासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी एक कुटुंब म्हणून आमचा पाहुणचार केला. त्यांचे आभारी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 


दरम्यान, मुंबईत आणखी दोन आमदार शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तसा सूतोवाच केला आहे. शिंदे गटात सामीर होणारे हे दोन आमदार ठाकरे कुटुंबाच्या जवळचे असू शकतात असं सांगितलं जात आहे.