Mukesh Ambani's Reliance Jio : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून Jio नावारुपाला आली आहे. मात्र दिवाळीपूर्वीच मुकेश अंबानी यांच्या Jio ला मोठा फटका बसलाय. जवळपास 10900000 लोकांनी म्हणजे 11 कोटी वापरकर्त्यांनी Jio ची साथ सोडली आहे. त्यामागे कारण ठरलं, काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने केलेल्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ. आता ही समस्या कंपनीसाठी मोठी आहे की नाही? (Reliance Jio 10900000 users left Jio still smile on Mukesh Ambani s face What is the reason)


काय आहे या खेळामागील गणित? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर एखाद्या कंपनी जेव्हा आपल्या प्लॅनच्या किंमतीत वाढ करते तेव्हा बरेच लोक दुसऱ्या कंपनीकडे वळतात. ही एक सामान्य बाब असते, असं टेलिकॉम तज्ज्ञ सांगतात. त्यात 11 कोटी वापरकर्त्यांनी Jio नेटकर्वला नकार दिला असला तरी  TRAI च्या अहवालानुसार, Jio अजूनही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. 


अहवालानुसार जुलैमध्ये मोबाईल टॅरिफ वाढल्यानंतरही, Jio 5G वापरकर्त्यांची संख्या 130 दशलक्ष वरून 147 दशलक्ष पोहचली आहे. यामुळे बाजारात जिओची पकड आणखी मजबूत झाली आहे. ARPU देखील 181.7 वरून 195.1 पर्यंत वाढ पाहिला मिळत आहे. मात्र जिओच्या एकूण वापरकर्त्यांची संख्या घटली आहे.


 


हेसुद्धा वाचा - Radhika Merchant : राधिका मर्चंटवर आकाश अंबानी नाराज? वाढदिवासाचा केक खाण्यास दिला नकार, पाहा VIDEO


 


जिओ कंपनीला फटका? 


जिओचे म्हणणे आहे की त्यांना त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम 5G नेटवर्क द्यायचे आहे. काही काळापूर्वी त्यांनी किमती वाढवल्या होत्या त्यामुळे काही यूजर्सनी Jio सोडले होते. पण जिओचे म्हणणे आहे की ते 5G नेटवर्क मजबूत करतील. जिओ एफडब्ल्यूए सेवेचा विस्तार करत आहे जेणेकरून अधिकाधिक घरे इंटरनेटशी जोडली जाऊ शकतील. यासह, जिओ भारतात 5G मध्ये आघाडीवर असेल.