Radhika Merchant Birthday Celebrate Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नाचे अनेक कार्यक्रम परदेशापासून भारतात अनेक ठिकाणी करण्यात आले. आशियातील श्रीमंत कुटुंबातील या लग्नाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत खेळजगातपासून राजकारणापर्यंत सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला आले होते. खरं तर हे लग्न सोशल मीडियावर खूप गाजलं. या सोहळ्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
या कुटुंबाची लाडकी आणि छोटी सूनबाई राधिका मर्चंट ही कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर राधिका मर्चंट हिचा सासरी पहिला वाढदिवस असल्याने मोठ्या थाट्यामाट्याने साजरा करण्यात आला. अँटिलिया इथे त्यांच्या आलिशान घरात संपूर्ण कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. राधिकाच्या या ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (Akash Ambani upset with Radhika Merchant birthday celebrate in antilia video viral )
राधिका मर्चंटने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस अँटिलियामध्ये तिच्या दोन्ही कुटुंबियांसोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये राधिकाने पांढऱ्या बॅकलेस टॉपसह लाल स्कर्ट घातलेला पाहिला मिळत आहे. पण या सोहळ्यात आकाश अंबानी अनंत अबांनीचा मोठा भाऊ राधिकावर नाराज आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेमकं काय झालं आणि यामागील सत्य जाणून घेऊयात.
झालं असं की, राधिकाचा वाढदिवस साजरा होत असताना तिथे मर्चंट आणि अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थितीत होते. राधिका केक कापताना तिच्या बाजूला नवरा अनंत अंबानी उपस्थितीत होता. केक कापल्यानंतर तिने केकचा पहिला घास अनंतला भरवला. त्यानंतर सासरे मुकेश अंबानी आणि त्यानंतर शेजारी उभे असलेले मर्चंट कुटुंब. आता ती केक भरवण्यासाठी पुढे सरकली तर तिथे आकाश अंबानी उभे होते. तिने केक भरवण्यासाठी तोंडावर केक नेला तर आकाश मागेसरकत नाही म्हणाला.
आकाशचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांना आकाश नाराज आहे का असा प्रश्न पडलाय. पण थांबा हा व्हिडीओ नीट पाहा, आकाश राधिकाला केक खाण्यास नकार देतो कारण त्याचा बाजूला अंबानी कुटुंबाची ज्येष्ठ त्यांची आजी कोकीलाबेन अंबानी आहेत. आकाश राधिकाला म्हणाला पहिले बा यांना केक खायला दे. राधिकाने आकाश यांचं म्हणं ऐकलं आणि बा ला केक खायला दिला. दरम्यान अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचं एकमेकांशी खूप छान संबंध आहे. आकाश हे राधिकाचे भावोजी असलेली तरी त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. एकमेकांसोबत मजा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
खरं तर ज्या लोकांना हे लक्षात आलं अशा नेटकऱ्यांनी आकाशचं खूप कौतुक केलंय. यूजर्स आकाशला सज्जन म्हणत आहेत. दरम्यान ओरी, अनन्या पांडे, शिखर पहाडिया, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, महेंद्र सिंह धोनी यांच्यासह अनेक स्टार्सनी पार्टीला हजेरी लावली होती.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.