प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : Reopen school in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) नियंत्रणात असल्याने राज्यातू 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोविडचे नियम पाळून शाळा सुरु करण्याच्या सूचना पालिकेने शाळा प्रशासनांना केल्या आहेत. शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यस्थापनाच्या शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हिड-19 च्या प्रसाराचे कमी होणारे प्रमाण लक्षात घेता यापूर्वी जारी करण्यात आलेल्या कोव्हीड-19 बबाबत महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाधीन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा  24 जानेवारी, 2022 पासून प्रत्यक्ष अध्ययन,अध्यापन सुरु करण्यासाठी आयुक्तांची मंजुरी दिली आहे. 


शाळांसाठी या आहेत मार्गदर्शक सूचना


- कोविड-19 बाबत महाराष्ट्र शासनाच्या ज्या आधीच्या सूचना आहेत, त्याचपुढे सुरु ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या आणि नगरबाह्य विभागाच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा दि. 24 जानेवारी 2022 पासून प्रत्यक्ष अध्ययन , अध्यापनासाठी सुरु कराव्यात.


- विद्यार्थ्याच्या पालकांकडून शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र प्राप्त करुन घेण्यात यावेत, ज्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्ययन,अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे.


- सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अध्ययन आणि अध्यापनासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित रहावे. 


- शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीकरिता संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविडच्या नियमांचे पालन करुन आवश्यकतेनुसार शाळेत प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्याबाबतची कार्यवाही मुख्याध्यापक स्तरावर करावी,


- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे संबंधीत सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने निर्जतुकीकरण करुन घ्यावे आणि कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष आणि लसीकरण केंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरीत करुन घ्यावे. इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या स्तरावर शाळांचे निर्जनुकीकरण करून घ्यावे.


- कोविड मेंटर, रेल्वे स्टेशनवर कोविड नमीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नेमणूका संबंधितांकडून रद्द करुन घ्याव्यात. 


- बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा महानगरपालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.


- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर लसीकरण करून घ्यावे. सर्व शाळांनी उपरोक्त मुद्दा क्र. 1 ते 8 येथील सुचनानुसार कार्यवाही करावी व त्याचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.