मुंबई : बंगळुरू येथे घडलेल्या घटनेचे मुंबईसह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुंबईत शिवालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमून शिवसैनिकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिवल्यापासून जवळ असलेल्या भाजप कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखलं. त्यामुळे पोलिस आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छोट्या छोट्या घटनेनंतर दगडफेक करणं उचित नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं.  एवढंच नव्हे तर कानडी पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचं समर्थनहि त्यांनी केलं... त्यांच्या या वक्तव्यामुळं हा वाद आणखी चिघळला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगरूळ येथे विटंबना करण्यात आली. त्याचे सीमा भागासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेत. बेळगावसह मराठी मुलुखात संतापाची लाट उसळली आहे. कन्नडिगांच्या विरोधात महाराष्ट्र पेटलाय. संतप्त मराठी बांधवांनी बेळगावात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. तर कानडी पोलिसांनी पुन्हा एकदा दडपशाही करत अत्याचार केले. 


मुंबईत शिवसैनिकांनी या घटनेचा नरिमन पॉंईंट येथील शिवालय या शिवसेना पक्ष कार्यालयाजवळ जमून या घटनेचा निषेध केला. येथून जवळ असलेल्या भाजप कार्यालयावर त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या निषेधाचे फलक झळकाविले.  मात्र, येथील पोलिसांनी त्याना रोखून धरले.