मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल आज राज्य सरकारला सादर होणार
मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केल्यानं आता आरक्षण देण्याचा मार्ग सरकारसाठी सुकर
मुंबई : मागसवर्गीय आयोगाचा बहुप्रतीक्षत मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल आज राज्य सरकारला सादर होणार आहे. २० हजार पानी अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना सादर केला जाईल. मराठा समाज आर्थिक आणि सामजिक दृष्ट्या मागास असल्याचं मागसवर्गीय आयोगाच्या अहवालातून पुढे आलंय. मुख्य सचिवांना सादर होणाऱ्या अहवालात मागासवर्गीय आयोगानं शास्त्रीय सर्वेक्षणातून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केल्यानं आता आरक्षण देण्याचा मार्ग सरकारसाठी सुकर होणार आहे.
सरकारचा निर्णय
पण समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण द्यायंच की तामिळनाडूच्या धरतीवर वेगळं आरक्षण द्यायचं याविषयी सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.
प्रकृती खालावली
दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या आझाद मैदानात सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. उपोषणा दरम्यान काही कार्यकर्त्याची प्रकृती आता खालावत चालली आहे.