मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला आहे. तसेच राज्यात शेतकऱ्यांनी पाच वर्षांत आंदोलन केली आहेत. त्याचाही आढावा घेणार आहोत. जी काही आंदोलने झाली आहेत. त्यावेळी दाखल झालेल्या गुन्हांचा आढावा घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत मराठा आंदोलन यातील आंदोलकांच्या कारवाईबाबत त्यांच्या नेत्यांसोबत बैठक होईल आणि पुढील दिशी ठरवली जाईल, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील पाच वर्षांत जी आंदोलने झाली आहेत. त्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ते बघितलं जाणार नाही, आकसाने वागणार नाही.  मराठा आरक्षण आंदोलनात जे प्रमुख पदाधिकारी आणि नेते होते त्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होईल, त्यानंतर निर्णय होईल. त्याचप्रमाणे राजापूरमधील नाणार रिफायनी प्रकल्प आणि मराठा आंदोलन यातील आंदोलकांच्या कारवाईबाबत आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.


तसेच राज्यात शेतकऱ्यांनी पाच वर्षांत आंदोलन केली आहेत. त्याचाही आढावा घेणार आहोत. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या ३४ निर्णयाचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा झाली, अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याचा आढावा घेतला आहे. मदत कशी करता येईल त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. किती निधी लागणार, कशी तजवीज करणार हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.