मुंबई : मुंबईतल्या ९५९ कोटींच्या रस्ते अपहार प्रकरणी चौकशी करण्यात आलेल्या १८५ महापालिका अभियंत्यांपैकी १८० जण दोषी आढळलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३४ रस्त्यांच्या कामातल्या गैरप्रकारांबाबत अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात आली होती. कामाच्या स्वरुपानुसार जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश उपायुक्त रमेश बांबळे आणि प्रमुख चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांना दिले होते. 


त्यांनी दिलेल्या अहवालावर दोषी अभियंत्यांना शिक्षा करण्याबाबत आदेश आयुक्तांनी दिलेत. त्यानुसार सहा अभियंत्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आलेत. 


अभियंत्यांवर कोणती कारवाई होणार आहे, ते बघुयात... 


- १८५ पैंकी १८० अभियंते दोषी, केवळ ५ निर्दोष


- सहा अभियंते बडतर्फ


- सहा जणांच्या निवृत्ती वेतनात कपात


- ६७ अभियंत्यांची वेतनवाढ वर्षभरासाठी रोखली 


- १७ जणांची २ वर्षांसाठी वेतनवाढ रोखली 


- १३ जणांची ३ वर्षांसाठी वेतनवाढ रोखली


- १६ अभियंत्यांना रोख दंड  


- आयुक्तांना अहवाल सादर