मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२-३ वर्षांपासून आरक्षणासाठी मोर्चे निघतायेत. त्याचा उद्रेक आज बघायला मिळतोय. मराठा आरक्षणाबाबत विरोधकांना बोलूच द्यायच नाही असं सेना-भाजपला वाटतंय. म्हणून ते सभागृह बंद पाडताय. आजच सरकारने  एक ओळीचा ठराव आणून आजच आरक्षण द्यावं. पण सरकारची ती इच्छा नाही. असं विखे पाटलांनी म्हटलं आहे.


सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येनं लोकं मुंबईत दाखल झाले आहेत. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणेने मुंबई दणाणून गेली आहे.