मुंबई : आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातोय की आकाश अंबानीचे लग्न रोज ब्लू डायमंडचे मालक रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहता हिच्याशी होणार आहे. मुकेश अंबानी आणि रसेल मेहता अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. 


रसेल मेहता भारतातील अव्वल हिरे व्यापाऱ्यांमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. दरम्यान दोन्ही कुटुंबांकडून याबाबत अद्याप कोणतेही विधान करण्यात आलेले नाहीये.


डिसेंबरमध्ये होऊ शकते लग्न


मीडिया रिपोटर्सनुसार आकाश आणि श्लोका यांच्या साखरपुड्याची तारीख काही दिवसांत जाहीर होऊ शकते. पीटीआयच्या माहितीनुसार आकाश अंबानी आणि श्लोका मेहता हे दोघेही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेत. 


श्लोका मेहताच्या वडिलांचे नाव रसेल अरुण कुमार मेहता आहे आणि ते पेशाने हिरे व्यापारी आहेत. ते रोज ब्लू इंडिया कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय रॉ डायमंड, डायमंड आणि ज्वेलरीला पॉलिश करण्यासंबंधित आहे. 


१९६०मध्ये सुरु केला होता व्यवसाय


रोज ब्लू कंपनी रसेल यांचे वडिल अरुण कुमार मेहता आणि भानुचंद्र भन्साली यांनी १९६०मध्ये सुरु केली होती. रसेल मेहता यांचा जन्म मुंबईत ६ डिसेंबर १९६१मध्ये झाला. ५७ वर्षीय मेहता यांचे ऑफिस वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. वेबसाईट www.dreshare.comच्या माहितीनुसार २०१८मध्ये रसेल मेहता यांची नेट वर्थ २५५ मिलियन अमेरिकन डॉलर (साधारण १७०० कोटी रुपये) मालक आहेत. 


बिग बी आवडते अभिनेते


वेबसाईटच्या माहितीनुसार रसेल यांना अमिताभ बच्चन आवडता. तसेच त्यांना हेमामालिनीचा अभिनयही पसंत आहे. त्यांना बुद्धिबळ खेळणे आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे. पावभाजी हा पदार्थ त्यांना आवडतो. 


कुटुंब 


रसेल मेहता कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव मोना मेहता आहे. त्यांची मोठी मुलगी दिव्या मेहताचे लग्न जेतिया कुटुंबात झालेय. जेतिया कुटुंब भारतात McDonaldची फ्रंचायझी चालवतात.