मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबईची तुलना 'पाकव्याप्त' कश्मीरशी केली तसेच मुंबई पोलिसांना माफिया म्हटलं या प्रकरणावरून वाद पेटला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून याचा पुन्हा समाचार घेण्यात आला. बेईमान लेकाचे! 'मुंबाई'मातेचा अवमान या मथळ्याखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी 'पंतप्रधान' म्हणून मोदींचा अवमान सहन केला जाणार नाही. मोदी हे फक्त एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून 'संस्था' आहे. तेच राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांबाबत आणि राज्यांच्या प्रांतिक अस्मितेबाबत बोलता येईल. 


राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे ही सुद्धा 'हरामखोरीच' म्हणजे मातीशी बेइमानीच आहे, असं सामनात म्हटलंय. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहत आहेत त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच. पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही. 



'मुंबई' मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे, या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलंय.