मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराने हाहाकार माजला. तसेच कोकण, नंदूरबार, नाशिक या ठिकाणीही पूरस्थिती पाहायला मिळाली. अनेक जण  बेघर झालेत. तसेच देशातही अनेक राज्यांत पुराचा कहर पाहायला मिळाला. कर्नाटक, गुजरात, केरळ, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये पुराने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत पुरामुळे आतापर्यंत २२५ जणांचा बळी गेला आहे. पुरामुळे झालेले नुकसान कसे भरुन काढायची याची चिंता आहे. याच पार्श्वभूमीवर भारत रत्न सचिन तेंडुलकर पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे. मी पुरग्रस्तांना मदत केली आहे. तुम्हीही करा, असे ट्विट करत मदत केल्याची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


देशात अनेक राज्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, संसास वाहून गेलीत. अनेक जण बेघर झाले आहेत. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था मदत करत आहेत. ग्रामस्थ, महिला यांनी पुढाकार घेऊन मदत कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. काही कलाकारांनी आपल्यापरिने मदत केली आहे. क्रिकेटपट्टूही मदत करत आहेत. आता सचिन तेंडुलकरने  पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली आहे. मी मदत केली. तुम्हीही पूरग्रस्तांना मदत करा आणि पाठिंबा द्या, असे ट्विट सचिनने केले आहे. या ट्विटबरोबर त्याने पुराचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.




दरम्यान, काल बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक कलाकार गाजावाज न करता पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे म्हटले आहे. “देशात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीतील पीडितांना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे येऊन मदत करीत आहेत. मात्र, ते या गोष्टी बोलून दाखवत नाहीत. त्याचबरोबर मलाही स्वतःला कोणालाही कळू न देता कोणत्याही धर्मादाय संस्थेला मदत करायला आवडेल, असे मत बच्चन यांनी केले. बच्चन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मदत करणार असल्याचे सांगितले.