Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या घराबाहेरुन आवाज येतो, अशी तक्रार त्याच्या शेजाऱ्याने केली होती. काल त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. सचिनच्या घराबाहेरुन खूप मोठ्याने आवाज येतोय, असे त्याने ट्विटरवर म्हटलं होतं. हे ट्वीट खूप व्हायरल झालं होतं. त्यावर अनेकजण रिप्लाय करत होते. विशेष म्हणजे तक्रारदाराने त्याने सचिन तेंडुलकरलाही मेन्शन केलं होते.सचिन तेंडुलकर सोशल मीडियात नेहमी अॅक्टीव्ह असतो. त्याच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेजारी आता खूष आहे. कारण त्याला फोन आलाय आणि त्याच्या तक्रारीचं निवारण झालंय. कोणी केला त्याला फोन आणि काय बोलणं झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरच्या घराचे बांधकाम सुरु आहे. या कामासाठी सिमेंट मिक्सरचा वापर होतो. त्यातून मोठा आवाज येत असल्याच दावा शेजाऱ्याने केला होता. सचिनचे नाव असल्याने दिलीप यांची ही पोस्ट व्हायरल झाली होती. लोक आपापल्या परिने कमेंटचा वर्षाव देखील करत होते. हे केवळ प्रसिद्धीसाठी करताय असे म्हणत कोणी त्यांच्यावर टिका करत होते. तर कोणी हा विषय गंभीर असल्याचे म्हणत त्यांना पाठींबा देत होते. दिलीप यांच्या पोस्टची सगळीकडे चर्चा झाली. सचिन तेंडुलकपर्यंत ही पोस्ट पोहोचल्याचे समोर आले आहे.


काय होतं पोस्टमध्ये?


प्रिय सचिन तेंडुलकर, आता रात्रीचे जवळपास 9 वाजले आहेत आणि दिवसभर तुमच्या वांद्र्याच्या घराबाहेर मोठा आवाज करत असलेला सिमेंट मिक्सर अजूनही सुरु आहे, असे सांगत कृपया तुमच्या काम करणाऱ्या लोकांना योग्य वेळी काम करण्यास सांगाल का?’ असा प्रश्नवजा सूचना त्यांनी सचिनला केली होती.


सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठमोठ्याने आवाज, चिडलेल्या शेजाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट


खुष झाला शेजारी 



शेजाऱ्याचे ट्विट सचिनने दुर्लक्षित केलं नाही, असं दिलीप डिसोजा यांनी म्हटलंय. मला सचिनच्या ऑफिसमधून फोन आला होता. त्यांनी कामाबद्दल सविस्तर सांगितलं. तसेच यापुढे आवाज कमी राहीलं, असा विश्वास त्यांनी दिला. यानंतर दिलीप यांनी ही माहिती देणारं दुसरं ट्विट केलं. यामध्ये ते एखाद्या फॅन्सप्रमाणे प्रतिक्रिया देताना दिसले.