नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी हे ९३ वर्षांचे होते.  वाजपेयींच्या निधनामुळे भारतीय राजकारणाचा दृढनिश्यची आणि संयमी चेहरा हरपल्याची प्रतिक्रिया देशातून व्यक्त होत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी देशाला मोठे योगदान दिलेय, असा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी श्रद्धांजली वाहल



अटल बिहारी वाजपेयी  यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ ला झाला. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य असून ते भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी भारताचे १० वे पंतप्रधान होते.   १९९६ साली पहिल्यांदा भाजपाने अन्य पक्षांच्या साथीने केंद्रात सरकार बनवले. वाजपेयींचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ फक्त १३ दिवसांचा होता.  १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.  भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार १३ महिने हे चालले. जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे १७ एप्रिल १९९९ रोजी अवघ्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. वाजपेयी यांनी छोट्या पक्षांना एकत्र घेऊन पाच वर्षे सरकार चालविले.  यावेळी एनडीएचा प्रयोग यशस्वी झाला आणि वाजपेयींनी १९९९ ते २००४ असा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.


विनोद कांबळी