मुंबई: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर पश्चिम रेल्वेचा सदिच्छादूत असणार आहे. विशेष जनजागृती मोहिमेत सचिनचा सहभाग असणार आहे. महिला प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत हे विशेष अभियान असणार आहे. यापूर्वीही जॅकी श्रॉफ, जॉन अब्राहम, झोया अख्तर यांनी रेल्वेच्या विशेष अभियानात सहभाग घेतला होता.