सचिन तेंडुलकरने वांद्र्यात विकत घेतला फ्लॅट
आयुष्यातला काही काळ ज्या वांद्रे पुर्व भागात घालवला त्याच परिसरात सचिनने हा फ्लॅट घेतलाय.
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वांद्रे पूर्व येथे फ्लॅट विकत घेतलाय. या फ्लॅटची किंमत बाजारभावानुसार सात कोटी १५ लाख रुपये एवढी आहे. पत्नी अंजलीच्या नावे सचिनने हा फ्लॅट घेतल्याचे समजते.
आयुष्यातला काही काळ ज्या वांद्रे पुर्व भागात घालवला त्याच परिसरात त्याने हा फ्लॅट घेतलाय. गांधीनगरमधल्या रुस्तमजी सिझन्समध्ये त्याने घर घेतलंय. याआधी त्याने वांद्रे पश्चिमेला एक बंगला विकत घेतला होता. त्यानंतर आता वांद्रे पूर्वेला १६०० चौरस फुटांचा हा नवा फ्लॅट विकत घेतलाय.