Criminals In Uniform । सचिन वाझे आणि अँटिलीया प्रकरणाची `इन साईड स्टोरी`? CIU-क्रिमिनल्स इन युनिफॉर्म
अँटिलीया कार स्फोटक प्रकरणात प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, पोलीस दलातील व्यक्तीने असं का केलं? कुणासाठी केलं? कुणाच्या इशाऱ्यावर केलं? यात बडी नावं कशी गुंतली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतात.
विशाल सवने; झी 24 तास; मुंबई: 2021 हे वर्ष मुंबई पोलीस दल (Mumbai Police), राजकारण (Politics) आणि उद्योग जगताला (Business Fraternity ) हादरवून सोडणारं होतं. याच वर्षाच्या सुरुवातील घडलं अँटिलीया कार स्फोटक प्रकरण (Antilia bomb scare case). प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराखाली एक स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात आली होती. या घटनेनंतर सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं हे केलं कुणी? का केलं? आणि कशासाठी केलं? हे प्रश्न निर्माण झाले. अखेर तपासाअंती या कटात पोलीस दलच असल्याचं समोर आलं आणि अनेकांना हादराच बसला. याच घटनेवर आधारीत आहे CIU-क्रिमिनल्स इन युनिफॉर्म (criminals in Uniform ) हे पुस्तक (Book)?
या पुस्तकाची खासियत काय ?
ज्येष्ठ पत्रकार राकेश त्रिवेदी (Rakesh Trivedi) आणि संजय सिंह (Sanjay Singh) या दोन्ही शोध पत्रकारांनी मिळून हे पुस्तक लिहलंय. या पुस्तकाचं कव्हर पेज (Cover Page) अनेक गोष्टींचा उलघडा करतंय. मात्र दोन्ही लेखक या पुस्तकाची कथा काल्पनिक असल्याचा दावा करतात. या पुस्तकातील सर्व नावं, व्यक्ती काल्पनिक असल्याचं दोन्ही लेखकांचं म्हणणं आहे. मात्र या पुस्तकातली असणारी कथा ( Crime Story) एंटालिया कार स्फोटक (Antilia bomb scare case) प्रकरणाशी मिळती जुळती आहे. या पुस्तकात एकूण 15 प्रकरणं आहेत. पहिल्या ओळीपासून ते अखेरच्या ओळीपर्यंत हे पुस्तक वाचकांना पुस्तकासोबत बांधून ठेवतंय. प्रत्येक प्रकरण जेव्हा संपतं तेव्हा वाचकांची उत्कंठा वाढते. कथानक जसे जसे पुढे जाते तसे ते अधिक रोमांचक आणि थरारक होते. सध्या वेब सिरीजचा जमाना आहे. पण हे पुस्तक वाचताना तुम्ही एखादी वेब सिरीज पाहात असल्याचा भास तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होतो. सध्या क्राईम स्टोरीवर अधारित अनेक पुस्तकं येतात मात्र गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारं CIU-criminals in Uniform हे वन ऑफ द बेस्ट पुस्तक असल्याचं अनेकांचे म्हणणं आहे.
पोलीस दलातील व्यक्तीने असं का केलं?
अँटिलीया कार स्फोटक प्रकरणात प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, पोलीस दलातील व्यक्तीने असं का केलं? कुणासाठी केलं? कुणाच्या इशाऱ्यावर केलं? यात बडी नावं कशी गुंतली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतात? हे पुस्तक नक्की वाचा आणि जाणून घ्या नेमका criminals in Uniform कोण?
Sachin Vaze and antilia bomb scare case inside story CIU criminals in Uniform