मुंबई : अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन ( Mansukh Hiren death case ) मृत्यूप्रकरणातले आरोपी सचिन वाझे ( Sachin Waze ) यांची NIA कोठडी 3 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज सचिन वाझेला कोर्टात हजर करण्यात आलेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टात सचिन वाझेने काय म्हटले?


एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टात सचिन वाझे म्हणालेत, ‘मला बळीचा बकरा बनविला जात आहे. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो, मला अचानक सांगितले की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय.’


जी काही चौकशी करायची होती ती करून झाली आहे, आता आणखीन पोलिस कोठडी देऊ नका अशी विनंती वाझेनी कोर्टात केली आहे. शिवाय आपल्याला कोर्टाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत, असंही वाझेनी म्हटलं. त्यावर या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात द्या, असे आदेश कोर्टाने वाझेना दिले.


मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणात आतापर्यंत एनआयएने 35 जणांचे जबाब नोंदविले आहेत. 112 TB एवढे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. दरम्यान सचिन वाझेला हॉटेलमध्ये एक महिला भेटायला आली होती, मात्र तिचा या गुन्ह्यात काही संबंध नसल्याचं एनआयए सूत्रांकडून समजते आहे.