मुंबई : संभाजी ब्रिगेडने आज विधानभवनाच्या गेटसमोर राडा घातला आहे. मराठा ओबीसीकरण आणि ओबीसी आरक्षणाचे संरक्षण , मराठा समाजातील नोकरीस पात्र २१८५ उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या , मराठा समाजातील विद्यार्थाचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, सर्व समाज घटकांची जातीनिहाय जनगणना करावी या मागणी करता आक्रमक झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार संभाजीराजे भोसले मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहे. राजेंनी कोल्हापुरमधून मुक मोर्चाला सुरुवात केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थगित केलं आहे. परंतु भूमिका बदलणार नसल्याचे राजेंनी म्हटलं आहे. राज्य सरकारसोबत चर्चा केल्यानंतर राजेंनी सरकारला १ महिन्याचा कालावधी दिला आहे. यानंतर राजे पुन्हा आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.



संभाजीराजे छत्रपती व्यासपीठावर मराठा समाज आणि समन्वयकांशी संवाद साधत होते. कार्यक्रम सुरु असताना संभाजी ब्रगेडच्या कार्यकर्त्यांनी शिरकाव केला आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नांवर राजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे म्हणाले, तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना विचारा, पालकमंत्र्यांना प्रश्न विचारा मात्र त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला जर प्रश्न विचारायचा असेल तर प्रथम मला मुख्यमंत्री करा असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. संभाजीराजेंच्या वक्तव्यानंतर समन्वयकांनी एक जल्लोष करत टाळ्यांचा वर्षाव केला आहे. परंतु संभाजीराजेंनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.