समीर वानखेडे यांना धमकी, `जे केलं त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागणार`
Sameer Wankhede death threats : IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना धमकी (Threat) देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना ही ट्विटवरवरून धमकी देण्यात आली आहे.
मुंबई : Sameer Wankhede death threats : Indian Revenue Service अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना धमकी (Threat) देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना ही ट्विटवरवरून धमकी देण्यात आली आहे. जे केलं त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील. आम्ही आता सगळं काही संपवून टाकू, अशा शब्दात धमकी देण्यात आली आहे.
अमन नावाच्या ट्विटरवर हँडलवरुन समीर वानखेडे यांनी ही धमकी देण्यात आली आहे. नवाब मलिकांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटवरून मेसेज करुन धमकी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वानखेडे यांनी याबाबत पोलिसांना कळवलं असून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना धमकीचे संदेश आला. 14 ऑगस्ट रोजी अमन नावाच्या ट्विटर हँडलवरून वानखेडे यांना एक संदेश आला. त्यात त्याने लिहिले होते, ‘तुमको पता है तुमने क्या किया है.. इसका तुम्हे भुगतान करना होगा…. तुमको खत्म कर देंगे…’ या मेसेजनंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस (Goregaon Police) ठाण्यात संपर्क साधला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी गुरुवारी वानखेडे यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.
गतवर्षी समीर वानखेडे हे मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख होते. नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना समीर वानखेडे यांच्या टीमने अटक केली होती. समीर यांच्या सुटकेनंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली होती. 2021 च्या क्रूज ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचेही नाव होते. या संपूर्ण प्रकरणात समीर वानखेडेंविरोधात नवाब मलिक यांनी जात प्रमाणपत्रावरुन तसेच इतर अनेक आरोप केले. त्यानंतर वानखेडे यांना NCBच्या पदावरुन हटवण्यात आले.
समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्रात क्लिन चीट
दरम्यान, समीर वानखेडे यांच्या जातीवरुन माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप केले होते. जात पडताळणी समितीच्या अहवालात नुकतीच समीर वानखेडे यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार, समीर वानखेडे जन्मतः मुस्लिम नाहीत. जात पडताळणी प्रमाणपत्रानुसार, समीर वानखेडे हे महार 37 अनुसूचित जातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.