BREAKING : sameer wankhede यांच्या सुरक्षेत वाढ
आता त्यांच्या सुरक्षेत 4 पोलीस तैनात केले जातील.
मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या इव्हेंस्टीगेशनमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे मुंबई पोलीस लवकरच समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत.
समीर वानखेडे यांनी आरोप केला होता की, मुंबई पोलिसांचे लोक त्यांचा पाठलाग करत आहेत आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. ते अनेकदा स्मशानात त्यांच्या आईच्या थडग्याला भेट देतात. मुंबई पोलिसांच्या दोन्ही पोलिसांनी त्यांचे स्मशानभूमीतून सीसीटीव्ही फुटेज घेतले होते.
तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी बाब समोर आली आहे,समीर वानखेडे यांच्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत 4 पोलीस तैनात केले जातील.त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची कार देखील बदलण्यात आली आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, वानखेडे नियमितपणे उपनगरीय ओशिवरा येथील स्मशानभूमीला भेट देत असत, जिथे 2015 मध्ये त्यांच्या आईचे मृत्यूनंतर दफन करण्यात आले होते. या अधिकाऱ्याने सोमवारी दावा केला की, ओशिवरा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी वानखेडेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्मशानात गेले आणि सीसीटीव्ही फुटेज घेतले
वानखेडे यांनी पोलिसांवर केलेल्या हेरगिरीच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनेही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारने कोणत्याही एजन्सीला समीर वानखेडेवर नजर ठेवण्याचे आदेश दिले नाहीत.
वळसे पाटील म्हणाले, 'सरकारने पोलीस किंवा राज्य गुप्तचर विभागाला समीर वानखेडेवर पाळत ठेवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. वानखेडे यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याचे मी ऐकले आहे. आम्ही त्यात लक्ष घालू. 'मंत्री म्हणाले,' मला वाटत नाही की पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.