नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; समीर वानखेडेंच्या वडिलांनी ठोकला मानहानीचा दावा
आज मोठं सत्य येणार उघडकीस
मुंबई : एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करणे महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना महागात पडू शकतं. त्याला कारण देखील तसचं आहे, समीर वानखेडेंच्या वडिलांची मलिकांवर मानहानीचा दावा ठोकला आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला असून 1.25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केले गंभीर आरोप
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांची स्वत:ची खासगी फौज असल्याचाही नवाब मलिक यांचा आरोप आहे. नाहीतर अधिकारी इतका श्रीमंत कसा असू शकतो? ते महागडी घड्याळे आणि कपडे घालतात...
नवाब मलिकांचं ट्विट
नवाब मलिक यांनी शनिवारी ट्विट करून म्हटले की, 'समीर दाऊद वानखेडेंच्या खासगी सैन्यातील एका व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन सत्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. मी उद्या सत्य उघड करीन... त्यामुळे मलिक आज काय सत्य समोर आणणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांना हाय प्रोफाईल आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. आता मुंबई ड्रग्स प्रकरणाची चौकशी दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. आर्यन खान प्रकरणासह वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार कडून काढण्यात आले आहेत.