संघर्षाला हवी साथ : परिस्थितीवर मात करून तो महापालिका शाळांत पहिला
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळं डॉक्टर होण्याचं रफिकचं स्वप्न साकार होईल का? ही शंकाच आहे
कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलं... आई आणि तो मामाच्या घरी राहतो... दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा भागात राहणाऱ्या रफिक शेखची ही संघर्षकहाणी... ठाणे महानगरपालिका शाळा नंबर १३ मध्ये उर्दू मिडीयममध्ये तो शिकला... त्याची घरची परिस्थिती हलाखीची आहे. तो दोन वर्षांचा असतानाच वडील वारले. तेव्हापासून त्याची आई आणि तो मामाच्याच घरी राहतात. मामा छोटी मोठी कंत्राटाची कामं घेतो. घरात आजी आजोबादेखील आहेत. मामा कमावता एकटाच... अशा परिस्थितीत रफिक शेखनं दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवले.
ठाणे महापालिकेच्या शाळांमधून पहिला येण्याचा किताब त्यानं पटकावला. भविष्यात डॉक्टर होऊन गरीब रुग्णांची सेवा करण्याची त्याची इच्छा आहे. पण, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळं डॉक्टर होण्याचं रफिकचं स्वप्न साकार होईल का? ही शंकाच आहे.
रफिकचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता गरज आहे ती समाजानं मदतीचा हात पुढं करण्याची... तुम्ही कराल ना त्याला मदत?
रफिकचा संघर्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी इथे क्लिक करा
संघर्षाला हवी साथ
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा.
झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३
संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९