मुंबई : राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीआधी धर्मेंद्र प्रधान-संजय राऊत यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी' पार पडली. भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज सकाळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या घरी ब्रेकफास्ट केला. प्रधान यांच्यासाठी खास बटाटेवडा, कांदेपोहे, उपमा या मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल होती. सकाळी 9 वाजता धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान संजय राऊत यांच्या 11 फिरोजशाह रोड या निवासस्थानी आले. तासभर ते राऊत यांच्या घरी होते.


सेनेबाबत धास्ती 


राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही नेते संसदेत एकत्र आले. अमित शाह-नितीशकुमार यांच्या फोननंतर भलेही उद्धव ठाकरे यांनी NDA प्रणित जेडीयूच्या उमेदवाराला जाहीर केला होता पण, भाजप पक्षश्रेष्ठींच्या मनात होती शिवसेनेबाबत धास्ती होती.अविश्वास ठरावावेळी मोदी सरकारला समर्थन देण्याचा व्हीप काढूनही, शिवसेनेने ऐनवेळी बदलली होती त्यामुळं ही धास्ती होती. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करण्याची नव्हती भाजप पक्षश्रेष्ठींची तयारी नव्हती त्यातूनच ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली.