`दोस्ती उन्ही से बनाओ जो निभाने की औकात रखते हो !`
`दोस्ती उन्ही से बनाओ जो निभाने की औकात रखते हो !`
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा कौल जनतेने युती सरकारच्या बाजुने दिला असला तरीही मुख्यमंत्री कोणाचा ? जागावाटप याचा तिढा अद्याप सुटतच नाही आहे. यावरून भाजपा-शिवसेनेचे संबध ताणले गेले आहेत. या सर्वात शिवसेना नेते संजय राऊत भाजपाला उघडपणे शिंगावर घेत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे ते सुरुवातीपासून सांगत असून यावर ठाम आहेत. सामनाच्या संपादकीयतून देखील ते रोखठोक भूमिका मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे सध्या राज्याचे लक्ष आहे. सध्या त्यांनी नुकतीच टाकलेली फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. 'दोस्ती उन्ही से बनाओ जो निभाने की औकात रखते हो !' अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
संजय राऊत हे उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तास्थापने बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. आपल्यापक्षासाठी नव्हे तर मित्रपक्ष भाजपासाठी ते चालले आहेत असे सांगण्यात येत आहे. जास्त संख्याबळ असलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी द्यावी अशी विनंती ते करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही सदीच्छा भेट आहे. यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.