मुंबई : 'जे कल येतायेत ते पाहता, एक तरुण नेता केंद्रातल्या सत्तेला सुद्धा काटे की टक्कर देतोय. तेजस्वी पर्व सुरू होतंय असं चित्र आहे तसेच आता  देशाने २०२४ साठी आत्मचिंतन करावे,' असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार निवडणूकीचे निकाल (Bihar Election Results 2020) काही वेळातच स्पष्ट होतील. अमेरिकेच्या निकालाप्रमाणे बिहारचा निकाल देखील वेगळा असेल असा विश्वास शिवसेनेने स्पष्ट केला होता. आता बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


अजून बिहार निवडणूक निकाल पूर्ण यायचे आहेत. तेजस्वीच्या समोर पूर्ण मंत्रिमंडळ होतं. मात्र या मुलाने ज्याप्रकारे टक्कर दिली आहे. हे भविष्याकरता मोठं संकेत आहे, असं राऊत म्हणाले. आता महाराष्ट्रात परिवर्तन झालं तेव्हा संपूर्ण देशाला संदेश गेला. आपण परिवर्तन करू शकतो आणि याचा रिझल्ट आपण पाहतो आहे, असं देखील राऊत म्हणाले. 


बिहारचा निकाल काही लागू द्या, पण ज्या प्रकारे जनतेने साहस दखवलंय, त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार. 'जंगलराज आज से खतम होगा, मंगलराज आज से शुरू होगा'.  बिहार मध्ये लोकांना बदल हवा होता तो दिसतोय, असं म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे. 



बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या भाषणात विकासाचे मुद्दे, रोजगाराचे मुद्दे यायला हवे होते. पण ते आलेच नाहीत.