मुंबई : NCB Drugs case : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी क्रांती रेडकर हिने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर दिले आहे. ( Kranti Redkar Letter to CM Uddhav Thackeray) या प्रकरणात क्रांती रेडकर यांचा काय संबंध, असा सवाल उपस्थित करत उपहासात्मक टीका केली आहे. क्रांती मराठी मुलगी आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असं म्हणत ज्या आयटी, ईडीच्या धाडी पडतायत ते अशोक चव्हाण, अजित पवार यांचे नातेवाईकही मराठीच आहेत, असा टोलाही लगावला. (Sanjay Raut On Kranti Redkar Letter to CM Uddhav Thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण मराठी नाही का? अजित पवार यांचे नातेवाईक मराठी नाही का ? दिल्लीवरून जे अतिक्रमण केले जात आहे. ED, CBI, NCB, IT ला पाठवून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांच्याशी ही लढाई आहे.  प्रश्न मराठी अमराठीचा नाही तर 'सत्य, असत्याचा' आहे. क्रांती रेडकर यांच्यावर व्यक्तीगत टीका केली गेली आहे. मला नाही वाटत. ज्याप्रमाणे दिल्लीतून आक्रमक सुरु आहे. त्यांचा मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न आहे. कालही धाडी पडल्या आहेत. येथे खरं आणि खोटं याचा प्रश्न आहे. आता बघुया.


शिवसेना तीच आहे. माननिय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाहेरचे अधिकारी येऊन महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध? सगळ्यांनाच घाम फुटला आहे. बघुया काय होते ते. सगळे इथेच आहे. कोणावर अन्याय होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.