मुंबई : पंतप्रधान मोदी यांची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. ही भेट नक्कीच चर्चेत राहिली. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिष्टमंडळासह दिल्लीत गेले होते. पण त्यांची पंतप्रधानांसोबत 30 मिनिटांची वैयक्तिक बैठक देखील झाली. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना सुरुवात झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी ही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे मोदी सरकारवर टीका करत असतात. त्यामुळे या भेटीवर त्यांची प्रतिक्रिया काय आहे. हे अनेकांनी जाणून घ्यायचं असेल.


संजय राऊत यांनी म्हटलं की, ठाकरे- मोदी भेट होणार म्हणजे चर्चा तर होणारचं. चर्चा सुरू झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे. केंद्राने मराठा आरक्षण विषय सोडवावा कांजूर मेट्रो शेड आशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यांनतर अर्धा तास वन टू वन चर्चा झाली.'


'राजकीय संदर्भ ज्यांना काढायचे आहेत त्यांनी काढावेत. मोदींसोबत जुने संबंध आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नेहमीच आम्हाला आदर आहे. नवीन सत्ता समीकारणांचा इथं विषय नाही. आमचा संघर्ष कायम नाही. केव्हा तरी त्याला पूर्णविराम द्यावा लागतो. केंद्राचा आणि राज्याचा संवाद वाढतोय. असं ही राऊतांनी म्हटलंय.


बाहेर बैठक सुरू असताना दोन महत्त्वाचे शिलेदार बाहेर उभे होते. भाजपचे अंदाज आतापर्यंत नेहमीच चुकत आले आहेत. त्यांना वाटलं होतं दहा पंधरा मिनिटं चर्चा होईल मोदींनी 90 मिनिटं वेळ दिला. असं देखील त्यांनी म्हटलंय.


विमानतळाच्या नावाचा वाद


दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यात यावं अशी मागणी होतेय. यावर मी बोलणार नाही. आमचे स्थानिक प्रतिनिधी यावर बोलतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली आहे.