मुंबई : ठरल्याप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत संजय राऊतांनी दावा केला आहे की, भाजपपेक्षा आमचा आकडा मोठा असून दहा आमदार आमच्याकडे जास्त आहेत. आम्ही भाजपला पुरून उरू असा दावा संजय राऊतांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा संजय राऊतांची पत्रकार परिषद गाजली आहे. अनेक प्रश्नांचा खुलासा संजय राऊत यांनी केली आहे. तसेच बहुमताचा संपूर्ण आकडा असलेले कागदपत्र आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमचंच सरकार स्थापन होईल असा विश्वास संजय राऊतांनी स्पष्ट केला आहे. तसेच या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचं देखील त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे आणखी 3 आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले आहेत. यामध्ये दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे. पिंपरी चिंचवडचे अण्णा बनसोडे हे आमदार अजित पवारांसोबतच आहेत.



आमदारांना गुडगावच्या हॉटेल ऑबेरॉयच्या रूम नंबर 5117 रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आलं. भाजपकडून आमदारांना ऑफरसोबतच दहशत दाखवण्यात आली.  दौलत दरोडा, अनिल पाटील, नरहरी जिरवळ यांना ज्या प्रकारे हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं ते चुकीचं. (हे पण वाचा - संजय राऊत यांचे सद्यस्थितीतल्या राजकारणावर नवे ट्विट)  


सत्ता मिळवण्यासाठी या देशाचे राज्यकर्ते कोणत्या धराला जातात ते घृणास्पद आहे. तुमच्याकडे जे बहुमत होतं ते दाखवून राज्यपालांकडे शपथ घेतली. बहुमत होतं तर ही  चंबलच्या डाकूसारखी गुंडागर्दी, दरोडेखोरी करण्याची गरज काय? असा सवाल देखील राऊतांनी विचारला  आहे. 


महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. आज यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी. महाराष्ट्राते पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. चव्हाणांवर देखील अशी वेळ आली होती तेव्हा बहुमत नाही सरकार स्थापन करू शकत नाही असं चव्हाणांनी व्यक्त केलं. अशा या महाराष्ट्रात अजित पवार आणि भाजपने जे कृत्य केलं ते चुकीचं आहे. 


शिवसेना भाजप, अजित पवारांना पुरून उरणार. आमचा आकडा तुमच्यापेक्षा जास्त असेल. बहुमत आमच्याकडे आहे. आमदारांची सह्या आणि फोटोंसह सगळी कागदपत्रे असल्यामुळे सरकार हे महाविकासआघाडीचंच असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.  आमचं सरकार स्थापन झाल्यावर वेड्यांची इस्पितळ तयार करणार आहोत. कारण सत्ता हातात नाही आली तर हे वेडे होतील. तसेच 'ऑपरशन कमल' हे विधानसभा निवडणूकीत दिसून आलं आहे. त्यावर आता बोलण्यासारखं काही नाही. 



राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. याबाबत त्यांना विचारलं असतं. कुटुंबात फूट पडू नये. म्हणून जवळची मंडळी आणि राष्ट्रवादीचे नेते शेवटपर्यंत प्रयत्न करत आहेत. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय चुकीचाही असू शकतो त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचं, संजय राऊत म्हणाले.