मुंबई : भाजपने ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून त्यांना खंडणीखोर बनविले आहे. पण, पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणारा आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने राज्यात लाखोंची लूट केली आहे. आमच्या ५, २५ रुपयांची चौकशी करता. केंद्रीय तपास यंत्रणांची धमकी देता. पण, राज्यात आमचेही सरकार आहे हे लक्षात ठेवा. कुंडल्या काढणायची धमकी देता. आता त्याच कुंडल्या घेऊन तुम्हाला तुरुंगात बसावे लागेल. 


सुरवात तुम्ही केली, पण त्याचा शेवट आम्ही करणार आहोत. आम्हीही पर्दाफाश करायला घेत आहोत. आमच्यामागे ईडी लावा, सीबीआय लावा पण, रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है आणि बाप काय असतो ते दाखवून देऊ असं राऊत म्हणाले.


जे कुणी किरीट आहेत. रोज त्यांचे एक प्रकरण बाहेर काढतोय. पालघरला येऊर गावात त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यांच्या मुलाच्या नावाने. मेधा सोमैया या त्या  प्रोजेक्ट्च्या डायरेकर आहेत. २६० कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. यात ईडीचे संचालक भागीदार आहेत, नील सोमैया आणि मेधा सोमैया भागीदार आहेत. इतके पैसे यांच्याकडे येतात कुठून? असा सवाल त्यांनी केला. 


 



भाजपने केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला. आमच्याही हातात बरेच काही आहे. पोकळ धमक्या देउन तुम्हीच फसणार आहेत. राणे यांचा ३०० कोटींचा घोटाळा किरीट सोमैया यांनीच बाहेर काढला होता. जे दलाली करताहेत त्यांनी केंद्रीय मंत्र्याची ही लढाई पुढे घेऊन जावे. 


त्यांनी त्यांच्याकडची कागदपत्रे पुढे करावी आम्ही आमच्याकडची देऊ. त्यांना लागणारी मदत आम्ही करू.सोमैया तुमच्यात हिम्मत असेल आणि तुम्ही सच्चे असलात तर ही लढाई पुढे न्या, असे आव्हानही त्यांनी सोमैया याना दिले.