कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) गेलेल्या आमदाराने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांचा विधानभवनातील एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे हे आमदार पुन्हा शिवसेनेत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  (sanjay shirsath tweeted shiv sena party chief uddhav thackeray old video in legaslative assembaly) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरेंचा हा जुना व्हीडिओ ट्विट केलाय. या ट्विटमध्ये आमदार शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेखही केला आहे. मंत्रिपद न दिल्याने संजय शिरसाठ नाराज असून हा व्हिडिओ ट्विट केलाय. त्यामुळे आणखी संभ्रम वाढलाय. त्यांच्या ट्विटमुळं शिंदे गटात खळबळ माजलीय.


शिंदे सरकारचा अवघ्या काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. संजय शिरसाठ यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे शिरसाठ दबावतंत्राचा वापर करत असल्याचंही म्हटलं जात आहे.


अन् ट्विट डिलीट


दरम्यान झी 24 तासने याबाबत सर्वात आधी बातमी दाखवली. यानंतर आमदार शिरसाठ यांनी हे ट्विट तातडीने डिलीट केलंय. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.