मुंबई : सलग सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली आहे. याचा परिणाम रेल्वे, बस सारख्या वाहतूक सेवांवर झाल्याने सतत चालत असणाऱ्या मुंबईला पावसाने विश्रांती घेण्यास भाग पाडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या गणेशोत्सवाचीही धामधूम सुरु असून गणेश मंडपांनाही या पावसाचा फटका बसला आहे. चौकाचौकात मंडप उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. वाढत्या पावसामुळे मंडपात दुर्घटना घडू नये म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून सुचना देण्यात आल्या आहेत.


संभाव्य दुर्घटना घडू नये यासाठी सर्व गणेश मंडळांनी आपले वीज कनेक्शन तात्काळ बंद करावेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत.



गणेश मंडळांच्या मंडपाचे बांधकाम करताना लोखंडी पत्र्यांच्या शेड उभारलेल्या असतात. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोखंडी मंडप आणि पाण्याचा संपर्क होऊन कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना पाण्याचा निचरा होईपर्यंत वीज कनेक्शन बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.