मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जावरून काँग्रेसनं सरकारला घेरलंय. सहकार मंत्र्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय ऑनलाईन अर्ज भरून दाखवावा, असं खुलं आव्हान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मंत्र्यांना दिलंय. 


शेतीची कामं सोडून शेतकरी अर्ज भरणार का? असा सवालही सतेज पाटलांनी केलाय. ग्रामीण बहुतेक ठिकाणी इंटरनेट सेवाही सुरळीतपणे उपलब्ध नाही. १५ पानी अर्जाचे सगळे रकाने भरणं ही साध्या-अडाणी शेतकऱ्यांसाठी अशक्य प्रक्रिया असल्याचं सतेज पाटलांचं म्हणणं आहे. 


आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत...