कर्नाटकरचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडीराव यांनी दावा केला आहे की, हिंदुत्ववादी विचारक विनायक दामोदर सावरकर मांस खात असतं. तसेच गो हत्येच्या विरोधातही नव्हते. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर मांसाहार करायचे का? हा प्रश्न चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचं उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी स्वतः 'झी 24 तास'च्या 'रोखठोक' कार्यक्रमात याचं उत्तर दिलं आहे. सात्यकी म्हणाले की,'गो रक्षकांनी हिंदू समाजाला गाईचं महत्त्व पटवून द्यावं. तिचं प्रतिपाळ करावा. गाईचा फक्त धार्मिक पद्धतीने विचार केला जातो. गायीमधून सशक्त वीण कशी तयार करता येईल यावर लक्षकेंद्रीत करा. आणि आर्थिक उदरनिर्वाह कसा वाढू शकतो? याकडे लक्ष देण्याचा सल्ला सावकरांनी दिला.' पुढे सात्यकी सांगतात की, हे न करता सावरकर कसे मांसाहार/ बीफ खायचे. किंवा सावकरकर कसे गो हत्येला प्रोत्साहन द्यायचे यावर चर्चा केली जाते. 


सावरकर मांसाहार करायचे का? 


सावरकरांनी गो हत्येला कधीच प्रोत्साहन दिले नाही. पण ते मांसाहार करायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे, असे सात्यकी म्हणाले. सात्यकी सावरकर यांनी पुढे सांगितलं की,''काय खावं काय प्यावं हा ज्याचा त्याचा आरोग्य शास्त्राशी निगडीत प्रश्न आहे. तुम्हाला जे पचेल तेच खा, न पचेल ते खाऊ नका, असा सल्ला सावरकरांनी दिला. 


स्वतः सावरकर ब्रिटनमध्ये असताना त्यांची आणि गांधींची भेट झाली. ही भेट सिनेमामधून दाखवण्यात आली आहे. यामध्ये सावरकर स्वतः कोलंबी करत होते. सावरकरांना वर्ज्य असं काही नव्हतं. सावरकरांना स्वतः अंडी आवडायची, मासे आवडायचे त्याच्या बाबतीत त्यांनी कधीच पवित्र-अपवित्र असे मानलेच नाही. एवढंच नाही तर मी एका विशिष्ट जातीत जन्माला आलोत तर मला हे निषिध्य आहे. तर असं काहीच नव्हतं.