मुंबई : यंदा चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजची निर्वासित ही एकांकिका अव्वल ठरली. तर पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजच्या ‘सॉरी परांजपे’ या एकांकिकेला उपविजेतेपद मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रभर सुरू असलेल्या एकांकिकामधून सर्वोत्तम एकांकिकेची निवड करण्यासाठी अभिनेता मकरंद अनासपुरे, निवेदिता जोशी आणि गिरीश जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. 


सिडनहॅमच्या निर्वासितलाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि लेखकाचाही पुरस्कार मिळाला, तर प्रक्षेकांच्या पसंतीचा पुरस्कार मुंबईच्या रुईया महाविद्यालयाच्या संगीत 'घागरे के पिछे..' या एकांकिकेला मिळाला.