मुंबई : जर तुमचं बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. एसबीआय बँक आपल्या सेवेत बदल करतेय. ग्राहकांच्या चांगल्या सेवेसाठी बँकेकडून नेट बँकिंग, फिक्स्ट डिपॉझिट दर, इएमव्ही चिप, डेबिट कार्ड आणि पेन्शन कर्ज यासारख्या सेवेत हा बदल केला जाणार आहे. याशिवाय बँकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा बंद करण्यात येत आहे. काही सेवा ३० नोव्हेंबरपासून बंद होतील. बँकेकडून १ डिसेंबर २०१८ पासून देण्यात येणाऱ्या या ४ सेवांचा लाभ घेता येणार नाही.


एसबीआय बडी अॅप आजपासून बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयने त्यांच्या वेबसाईट द्वारे ग्राहकांना ३० नोव्हेंबरपासून एसबीआय बडी सेवा बंद होत असल्याची माहिती दिली आहे. एसबीआय बडीचा वापर १ डिसेंबरपासून करता येणार नाही. ज्या ग्राहकांचे पैसे या एसबीआय 'बडी वॉलेट'मध्ये आहेत. ते ३० नोव्हेंबरपर्यंत बँकेतून काढू शकतात. एसबीआयच्या वतीने एसबीआय 'बडी वॉलेट'ला पर्याय म्हणून गेल्या वर्षी 'योनो' हे अॅप सुरु केलं आहे.


तर नेट बँकिंग बंद होईल !


तुम्ही जर मोबईल नंबर बँक खात्यासोबत लिंक केला नसेल, तर या सेवेचा लाभ तुम्हाला १ डिसेंबरपासून घेता येणार नाही. मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा, असे मेसेज खातेधारकांना पाठवून याबद्दलची कल्पना दिली आहे.


जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची संधी


जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य सेवानिवृत्त असतील, आणि त्यांची पेंशन एसबीआयच्या शाखेत येत असेल, तर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. (३० डिसेंबर २०१८). बँकेकडून सर्व खातेधारकांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. प्रमाणपत्र जमा न केल्यास पेन्शन मिळण्यास अनेक समस्यांना सामोरं जाव लागेल.


पेंशन कर्जाची सुविधा संपणार


एसबीआय तर्फे पेंशनधारकांना सणासुदीच्या काळात कर्ज देण्याची सुविधा सुरू केली होती. ज्यांची पेंशन एसबीआयच्या बँकेत येते, अशा खातेधारकांसाठीच ही सुविधा होती. या योजनेतंर्गत कर्ज काढताना कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नव्हती. ७६ वर्षापैकी कमी असलेल्या आणि राज्य, केंद्र आणि लष्करातून निवृत्त असलेल्या पेंशनधारकांसाठी ही योजना सुरु केली होती. ही सुविधा ३० नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.