मुंबईत उद्या स्कूल बस चालकांचा संप
या संपात टेम्पो, खासगी बस आणि ट्रक वाहतूकदारही सहभागी होणार आहेत.
मुंबई: राज्यभरात दूध दरवाढीच्या आंदोलनाने जोर धरला असतानाचा आता मुंबईतील स्कूल बस चालकांनी संपाची हाक दिली आहे. इंधनाचे दर हे वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणावेत, या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. त्यानुसार उद्या मुंबईतील स्कूल बस बंद राहतील. या संपात टेम्पो, खासगी बस आणि ट्रक वाहतूकदारही सहभागी होणार आहेत.